STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

तुला सोडून जाताना

तुला सोडून जाताना

1 min
318

बघ...कळलंही नाही तुला

कधी, कसा शिरलो तुझ्या घरात..

एक अनाहूत पाहुणा म्हणून..

मांजरपावलाने..तुझ्या नकळत.

कळलं तुला ते ही तसं उशिराच..

मीच माझं अस्तित्त्व दाखवून दिल्यावर

किती तारांबळ उडाली ना तुझी!

सोबत तुझ्या घरच्यांचीही.

भय, काळजी, शंका..

सगळ्या संमिश्र भावना

दाटून आल्या होत्या एकाचवेळी. 

पण सावरलंस लवकरच स्वतः ला

चालू केलीस धडपड लगेच..

उमटू नयेत घरभर तुझ्या, माझ्या पाऊलखुणा म्हणून. 

जोरदार मारा करत होतीस...

कोणाकोणाच्या सल्ल्याने.

झेपत नव्हता मलाही..

असा तुझा पाहुणचार.

पण मी ही चिवट..

तुझ्यासारखाच...

बघूया म्हटलं कोण हरतंय 

आणि कोण जिंकतंय

या लढाईत!

निमूट गिळत राहिलो..

तू दिलेलं सगळं..आवडत नसलं तरी..

त्याला प्रत्युत्तर म्हणून..

काय काय केलं मी ही..

देता येईल तितका त्रास दिला,

एकटं पाडलं तुला सगळ्यांपासून..

पारखं केलं तुला मायेच्या स्पर्शापासून..

थोडथोडकं नव्हे..

तब्बल चौदा दिवस मोजून. 

लढा चालूच होता आपला दोघांचा.

पण..पण किती फरक होता तुझ्या माझ्या लढ्यात!

माझा लढा होता.. फक्त तुझ्याशी,

आणि तुझा..माझ्याशी तर होताच..

सोबत मनात येऊ पाहणाऱ्या नैराश्याशी!

हा दुसरा लढा जिंकलीस ना जेव्हा..

मात केलीस माझ्यावर तेव्हा.

कबूल करतो आता मी..

आहेस तू चिवट.

जेवढा आत्मविश्वास होता मला

तुझ्या घरात शिरताना..

गमावून बसलोय सर्वस्व माझं

तुला सोडून जाताना...


Rate this content
Log in