STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

बिंदू

बिंदू

1 min
197

प्रेम कोणावर करावं?

प्रेम कोणावरही करावं..

सांगून गेले कुसुमाग्रज.

प्रेम सौंदर्याची जाणीव करुन देणाऱ्या

आपल्या डोळ्यांवर करावं..

रसास्वादाची तृप्ती देणाऱ्या

आपल्याच रसनेवर करावं..

चांगलं ऐकून वाईट सोडून देणाऱ्या

स्वतःच्या कानांवर करावं..

प्रेम कोणावरही करावं.

प्रेम गोड बोलणाऱ्या 

आपल्या शब्दांवर करावं..

सुगंधात न्हाऊ देणाऱ्या

आपल्याच नाकावर करावं..

कायम सत्कर्म करणाऱ्या 

स्वतःच्या हातांवर करावं..

प्रेम कोणावरही करावं. 

प्रेम सन्मार्गाच्या वाटेने चालणाऱ्या

आपल्या पावलांवर करावं..

मायेचा पाझर असणाऱ्या

आपल्याच हृदयावर करावं..

निर्झरासारख्या निर्मळ 

स्वतःच्या मनावर करावं..

प्रेम कोणावरही करावं.

प्रेम आपलं आपणच 

आपल्यावर करावं..

आतपासून बाहेरपर्यंत..

आदिपासून अंतापर्यंत..

अगदी एका बिंदूपासून..

दुसऱ्या बिंदूपर्यंत.


Rate this content
Log in