STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

जिणे

जिणे

1 min
167

सभोवतालची गर्दी..

कधी हवीहवीशी वाटणार

तर कधी अगदी नको नकोशी

शेवटी हे असं वाटणं आपल्याच

मुडवर तर असणार..


मनात वसंत फुलेल तेव्हा..

आपण सगळ्यांशी 

हसत-खेळत बोलणार..

सारखी कोणाच्या तरी सोबतीची

अपेक्षा ठेवणार..

भोवताल सगळा गर्दीने

फुललेला हवा वाटणार..


पण तेच मनात जेव्हा..

वैशाख वणवा पेटेल तेव्हा

मनातली रखरख बाहेर पडणार..

कधी ओढ लावणारी गर्दी

आता मात्र दूर लोटावी वाटणार..

अगदी एकटं एकटं अन् 

अबोल रहावं वाटून जाणार..


कधीतरी असं वाटणं 

ठीक आहे पण...

पण..सततच असे मूड 

बदलत राहिले तर मात्र

गैरसमज, दुरावा यांनाच

सामोरं जावं लागणार..


असं जिणं जगण्यापेक्षा..

गर्दीत राहूनही आपल्याला

आपलं आपलेपण

आपलं एकटेपण

आपलं वेगळेपण

जपायला यायला हवं..


Rate this content
Log in