STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

पाऊल

पाऊल

1 min
163

इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का स्वच्छंदीपणे वागून..

कल्पनेतल्या भराऱ्या प्रत्यक्षात घेऊन..

बघावं का?


इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का बांधिलकीला थोडं बाजूला ठेऊन..

मऊशार गवतावर हलकेच पाऊल टाकून..

बघावं का?


इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का गोतावळ्यातून बाहेर पडून..

काही क्षण तरी एकटीसाठी ठेऊन..

बघावं का?


इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का भूतकाळाचे दोर तोडून..

चाचपडत का होईना चालावं मळवाट सोडून..

बघावं का? 


इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का थोडं धाडसी होऊन..

भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगून..

बघावं का? 


इथपर्यंत आलोच आहोत तर, 

बघावं का स्वानंदात उडी घेऊन..

तरले तर उत्तमच..

पण धडपडले जरी,

तरी प्रयत्न नक्कीच करणार परत उठून..

बघावंच आता. 


Rate this content
Log in