STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

विश्वास

विश्वास

1 min
193

जोवर श्वास आहे, विश्वास ठेव.

जोवर श्वास आहे,

दूषित करणार नाही कधीच

तुझ्या निर्मलतेला...

स्वार्थासाठी अडवणार नाही कधीच

तुझ्या प्रवाहीपणाला...

सरिते, विश्वास ठेव.


जोवर श्वास आहे,

ओरबाडणार नाही कधीच

तुझ्या पर्णसंभाराला...

विद्रुप करणार नाही कधीच

तुझ्या शाखा विस्ताराला...

वृक्षा, विश्वास ठेव. 


जोवर श्वास आहे, 

बीज रोवेन कायमच

तुझ्या समृद्धीचं...

स्वप्न जागतं ठेवेन कायमच

तुझ्या संपन्नतेचं...

वसुंधरे, विश्वास ठेव. 


जोवर श्वास आहे तोवर,

संवर्धन करेन कायमच

या सुजलाम सुफलाम भूमीचं...

विश्वास ठेव. 😊


Rate this content
Log in