STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance

4  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

मागे वळून बघताना

मागे वळून बघताना

1 min
270

मागे वळून बघताना ते गाव,

मज अनोळखी वाटले.

स्वप्न की सत्य हे,

माझी मला मी परकी भासले.

पाऊल खुणा नव्हत्याच कोणत्या,

पाऊले कुठे आपली एकत्र चालले.

वाऱ्या वर नाद तुझाच होता,

झुळझुळणार्या नदीवर ताल तुझाच होता.

सार काही तुझ्या पर्यंत येऊन,

मी मात्र रिक्तच कसला हा उन्माद होता.

मी विचारले पाना फुलाला ,

पुन्हा कधी तू आला होता का?

हसून बापडी ती बोलली,

तुझ्या तुन कधी तो अलग झाला होता का?

 मग काहीच कसे नाही आज,

 माझ्या हाता मध्ये?

 का तू सोबत नसण्याच्या,

 रेषाच नवहत्या माझ्या हाता मध्ये?

  मागे वळून पहाता आज,

  सारे काही समजून आले.

  तुझ्या माझ्या असण्याचे ,

  उरलेच नाहीत रे दाखले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract