सुखी संसार सूत्र
सुखी संसार सूत्र
संसार संसार / विवाह बंधने /
गोडशा प्रीतीने / बंधनात //(1)
संसार दोघांचा / असावा गोडीचा /
विश्वास प्रेमाचा / अभेद्यचि //(2)
सुख -दुःख दोन्ही / समान मानावे /
निराश न व्हावे /संकटात //(3)
आधार दोघांनी / उभयता द्यावा /
जीव जडवावा / प्रेमभरे //(4)
उणीव कशाची / प्रसंगी जाणवे/
सांभाळून घ्यावे / एकमेकां //(5)
संसाराचा गाडा / पोरखेळ नसे/
त्यागातचि वसे / समाधान //(6)
न
ातीगोती सारी / गोडीने सांभाळी /
कटू शब्द टाळी / वाणीमधे //(7)
संसार वेलीला / बहर सुखाचा /
गोमट्या फळांचा / प्रसादचि //(8)
लीला कन्हैय्याच्या / आनंदे पहाती /
स्वर्ग सुखहाती / भासतसे //(9)
प्रेमाने वाढवी / मायेने सांभाळी /
वत्सल माऊली / काय वर्णू //(10)
संसारात नित्य / ज्येष्ठ सांभाळावे /
नित्यचि पुसावे / प्रेमभावे //(11)
नाते सहवासे / रेशीमबंधांचे /
मायेचे प्रेमाचे / गोड पाश //(12)