Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

BABAJI HULE

Abstract

4  

BABAJI HULE

Abstract

खुर्ची-एक व्यसन !

खुर्ची-एक व्यसन !

1 min
299


शोधण्याचा प्रयत्न असतो तो म्हणजे एक पद 

जेथे मिळेल आणि गाजवेल वर्चस्व निर्विवाद. 

स्वार्थ आणि लाच याचा साधायचा असतो एक संगम 

मग नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणाचा ही करावा लागतो त्याग.

 

शिक्षणाचा गर्व आणि अपात्रतेनंतरही एकच ध्यास 

तर कधी नात्यावरही मात आणि गादीचा हव्यास. 

नेहमी दुसऱ्याकडील ओरबडण्याची नीती 

तर कधी कधी पिढ्यान-पिढ्याचे वाद रंगविण्याची रणनीती. 

 

नेहमीच दाखवावे लागते आपले वर्चस्व 

त्यासाठी विसरतात साम, दंड आणि भेदभाव.

द्यावा लागतो पारदर्शकतेला पूर्णविराम 

त्यासाठी करावी लागतात रात्रीच्या अंधारात खलबतं.

 

आपलीच असणारी स्वच्छ नजर

करावी लागते पट्टी बांधून आंधळी. 

तर कानावर धडकणारा सत्याचा आवाज 

धुडकावून द्यावा लागतो बिनधास्त. 

 

यासाठी करावा लागतो फार मोठा आटापिटा खास 

शोधावी लागतात आपल्यासारखीच आपलीच माणसं. 

ज्यांना सत्य ऐकू येणार नाही असे कानाचे पडदे फाटलेली 

आणि योग्य दिसणार नाही अशी डोळ्यावर पट्टी बांधलेली. 

 

मग मारायच्या नुसत्या जनहिताच्या गप्पा 

आणि जनतेसमोर ठेवायचा चुकीचा घोषवारा. 

धावावे लागते बऱ्याच वेळेला खुर्ची पाठी 

कधी स्वतःची झोळी भरण्यासाठी तर कधी सत्य लपविण्यासाठी. 

 

ज्यांचेकडे आहे स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शीपणा 

टिकवून आहेत नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा. 

नाही रामराज्य तरीही असे काही आहेत याला अपवादी 

हे सर्व झुगारून स्वयंघोषित पदभार संभाळणारे असतात काही मनुवादी 

 

बरा नव्हे एवढा अहंपणा आणि अहंकार 

हिम्मत असेल तर दाखवून द्या एकीचा पुरस्कार. 

कधीना कधी मी पणाची किंमत मोजावी लागते

क्षणिक सुखाची खुर्ची ही दोलायमान अवस्थेत जाते.                          


Rate this content
Log in