STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

रंग होळीचे

रंग होळीचे

1 min
202


वेदीमधे होलिकेच्या

दुष्ट दुर्गुणांना जाळू

काम क्रोध मद लोभ

मत्सराला दूर करु   (१)


जुन्या रुढी परंपरा

नको नवीन काळात

दान करु गरजूंना

पुण्य जोडू अंतरात   (२)


पानगळ जमा करु

देऊ होळीत टाकूनी

मनातील द्वेष सूड

दूर करु होळीतूनी    (३)


सदा सत्संग असावा

नित्य सदाचार व्हावा

नको असूया मत्सर 

भाव एकीचाच हवा   (४)


मन सुंदर आरसा

सदगुण प्रतिबिंब 

स्वच्छ ठेवूनी तयास

जीवनात यशानंद   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract