STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract Tragedy

4  

Manisha Awekar

Abstract Tragedy

सुशिक्षित बेकार

सुशिक्षित बेकार

1 min
276

पोटाला चिमटा घेऊन

आईबापानी शिकवले

पदवी प्राप्त होताच

खुशीने मन मोहरले


नाव नोंदवले लगेच

अनेक अर्जही टाकले

परंतु कोणाचेच त्याला

 उत्तर नाही आले

 

वाट पाहता पाहता

आईवडील शिणले

कधी रे कमवणार तू!!

डोळे भरुन आले


दोष कुणाचाच नव्हता

नशीब आड आले

पदवीधर असूनही

काम नाही मिळाले


दैवाची गती कशी

कुणालाच ठाऊक नसते

सुशिक्षित बेकाराचे दुःख

अंतरात सलत असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract