STORYMIRROR

Anagha Kamat

Abstract

4  

Anagha Kamat

Abstract

मन

मन

1 min
206

खुळे आहे माझे मन 

रोज बघते तुझी वाट 

एक दिवस भेटायला ये 

तशी आमची मैत्री होती दाट 


मनाला खूप समजावले मी 

तरी सुद्धा बिचारे ऐकेना 

आता भेट नाहीं व्हायची 

पण त्याला काही तें रुचेना 


म्हणून म्हणते एक दिवस ये 

परत तुला देणार नाही मी दु:ख 

खऱ्या प्रेमाची व्याख्या काय असते 

ते समजावण्याची करणार नाही चूक 


प्रेम केले तुझ्यावर मनापासून 

थोडे लपवून , थोडे जपून 

तुला माझा करायचं होतं 

हृदय माझं तुला देऊन 


माझं प्रेम तुला नाही दिसलं 

कारण तें नाजूक सौम्य होतं 

भलत्याच प्रेमाला बळी पडलास 

त्यावेळीं माझं मन दुखावलं होतं 


आज इतक्या वर्षांनी आठवण झाली 

ज्यावेळी आयुष्याची मी उजळणी केली 

सगळ्या आठवणींची साठवण केली 

अंतर्मनांतल्या खोल कप्प्यात ठेवली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract