संस्कार
संस्कार


रस्त्यावरच्या गरीब भिकाऱ्याला पाहून
मनांत आमच्या कणव दाटून यावी
पोरांटोरांना कुत्र्यांवर दगड मारताना बघून
भूतदया आमचे अंगीं रिगावी
खून, लुटमार, चोऱ्यांच्या गोष्टी ऐकून
चांगल्या संस्कारांची जोपासना व्हावी
बलात्कार, विनयभंगाच्या गोष्टी ऐकून
भावाबहिणीच्या प्रेमाची भावना रुजावी
भांडणं, तंटा, वादविवाद बघून
चांगल्या उपजत गुणांची आठवण करावी
आतंकवाद्यांच्या भयानक बातम्या वाचून
मनांत देशहिताची सद्भावना अंकुरावी
एकमेकांची निंदानालस्ती करताना ऐकून
आमच्या तोंडून गोड शब्दांची उधळण व्हावी