आई
आई
1 min
231
आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे ईश्वर
ईश्वराने आईची रचना केली
आईवर आपली जबाबदारी दिली
आई मुलांचं करते खरं, नीट संगोपन
त्यांचे खाणंपिणं ,शाळा आणि अध्यापन
आई मुलांची चूक घेते पदरांत
ती मुलांची सोय ठेवते लक्षांत
स्वतः काढील उपास तापास
पण मुलांसाठी ठेवील घास
आईची असते बाळांवर ममता
सोपेपणाने सोडवील संसाराचा गुंता
अशा आईचा मानावा उपकार
म्हातारपणी त्यांना द्यावा हो आधार
