STORYMIRROR

Anagha Kamat

Children

3  

Anagha Kamat

Children

आमची मनी

आमची मनी

1 min
188

होती आमच्याकडे एक काळी पांढरी मनी 

पहायला आवडायचे मला तिचे खेळ अनेक 

ऊंच उड्या लांब उड्या, धावणं पळणं  

मजाच करत होती माझी मनी एक एक 


लपलेल्या उंदरावर झेप घेत होती 

तिच्या तावडीतुन उंदीर सुटायचा नाही 

फडशा त्या उंदरांचा पाडून लगेच 

सोफ्यावर झोपून छतावर पाही 


छतावर कधीतरी दिसायची पाल 

तिची म्यांव म्यांव ,गुरगूर सुरूच असायची 

मनी बिचारी तिचे करायची हाल 

खिडक्यांवरच्या उड्यांनी तिला पकडायची 


मनी होतीच आमची असामान्य 

सकाळच्या उन्हांत अंगणात बसायची 

दुपारचं पोट भरल्यावर लगेच 

मांडीवर माझ्या वाटोळीच झोपायची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children