STORYMIRROR

Anagha Kamat

Others

3  

Anagha Kamat

Others

खरं वैभव

खरं वैभव

1 min
234

झोपडीवजा लहानसंच घर 

घरासमोर भव्य अंगण 

अंगणात सुंदर तुळस 

तुळशीपुढे सुबक रांगोळी 

नक्षत्रांची, ॐ स्वस्तिकांची 

स्वस्तिक हळदकुंकूने रेखलेले 

आल्यागेल्याच्या नजरेत जाणारे 

डोळ्यांना दिलासा देणारे 

सभोवती सुंदर फुलझाडे 

एकेक फुलांनी भरलेले 

अबोली,गुलाब, मोगरा 

मोगरीच्या फुलांचा वेल 

घराच्या दारी नटलेला 

सफेद फुलांनी डवरलेला 

येणाऱ्याजाणाऱ्यांची नजर न लागो 

घरातलं वैभव फळो फुलो 


Rate this content
Log in