STORYMIRROR

Anagha Kamat

Children

3  

Anagha Kamat

Children

जावई गेला सासुरवाडीला

जावई गेला सासुरवाडीला

1 min
224

जावई गेला सासुरवाडीला 

सासूसासऱ्यांना आनंद झाला 

जावई गवताच्या गंजीवर बसला 

वरतीच बसून चहा प्याला 

नंतर जावई खाली आला 

सगळ्यांनाच आनंद झाला 

जावई बसला जेवायला 

सासूने सुरू केले वाढायला 

सासूने खूप आग्रह केला 

खीर लागली वाढायला 

जावई लागला लाजायला 

जावयाने पानावर हात धरला 

खिरीच्या थेंबाचा स्पर्श झाला 

जावई लागला चाटायला 

जावयाला तो गोड लागला 

पण लाज वाटली मागायला 

नको नको म्हणायला लागला 

कठीण होते ,रूच विसरायला 

रात्र झाल्यावर बिचारा झोपला 

पण खिरीच्या आठवणीने जागा झाला 

थेट स्वयंपाकघरात तो शिरला 

भांड्यांवरची झाकणं काढू लागला 

एका झाकणाचा आवाज झाला 

मांजर समजून तिथे सासरा आला 

येतानाच त्याने झाडू आणला 

काळोखांतच लागला बदडायला 

जावई म्यांव म्यांव करू लागला 

कुटत पळत अंथरुणावर पडला 

साऱ्याचा अर्थ सासऱ्याला कळला 

गालातल्या गालात तो हसूं लागला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children