बालपणीच्या आठवणी
बालपणीच्या आठवणी


मित्रांच्या सहवासात रमती
पारावरील आनंदी गुजगोष्टी
आठवनितील सागरलाटेने
घेऊनी येई सुखाची भरती //१//
चिंचा, बोरं, खाऊ आवळे
करीत मज्जा नाचू या सारे
जंगल मंगल साजरे सोहळे
चिंब भिजती झेलीत थंड गारे //२//
लगबगीत सायकलची स्वारी
नदीतीरावर आंघोळ मौजेत
विटी दांडू अन् खेळू लगोरी
येई घोळका आरोळी देत //३//
आजोबांच्या खांद्यावर बसुनी
भ्रमण करी साऱ्या गावाचा
डोके आजीच्या मांडीवर ठेऊनी
वेड रात्री चांदण्या मोजयचा //४//
आईचा मी लडिवाळ बाप्पा
बाबांचा मिठीत रमणारा
ताईच्या गळ्याला मी ताईत
सर्वांनाच हवा असणारा. //५//
बालपणातील दिस ते मजेचे
सर्वांच्याच स्मृतीत कोरलेले
आयुष्यातील जीवन प्रारंभाचे
अमिट साठा हृदयी जपलेले. //६//