Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendra Bansod

Others

3  

Rajendra Bansod

Others

स्त्री कर्तुत्वाला जपावे..

स्त्री कर्तुत्वाला जपावे..

1 min
257


दिला जन्म तुम्ही

दुनिया ही दाखविली

राखी बांधुनी मनगटावर

मनोबलास भक्कम केली//1//


उपसली आयुष्यभर कष्ट

त्यागुनी अपेक्षा तू पत्नी जाहली

दुःख झेलण्या बापाचे गं

लडिवाळ कन्या रूपाने आली//2//


अनंत रूपाने जगताना तू

केलीस अपार उपकार या सृष्टीवर

पण आजही अशी पोरकी का?

गर्भाशयातील अस्तित्वावर //3//


गर्भपाताचा अभिशाप का?

खाण जरी ही कर्तुत्वाची

सिद्ध झालीस या भूवरी

तरी आज रास तुला दूषनांची. //4//


मानुनी अबला ही नारी

केवळ शुभेच्छा रुपी शब्दांनी

संपेल का हो विषमतेची दरी

कोंडलेला श्वास सोडूनी ,. //5//


भावनांस पंख फुटेल का?

तुझा युगा-युगातील वेदना विरूनी

स्त्री कर्तुत्व जग मानेल का?

जीवन रुपी रथाचे सारथी होऊनी. //6//


Rate this content
Log in