Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajendra Bansod

Others

3  

Rajendra Bansod

Others

तू सोबत असतांना

तू सोबत असतांना

1 min
10


तू सोबत असतांना आई

पखरण नेहमी मायेची

दातृत्वाचा आधार माझा

भीती नाही कशाचीही //१//


तू सोबत असतांना बाळा

बहीण मायेची सर आणी

किलबिल सदा अंगणी

गुंजित मधुर संगीत गाणी //२//


तू सोबत असतांना मित्रा

जग मला भासी पूर्ण

आनंदाने भरती जत्रा

अभावातही जग सुवर्ण //३//


तू सोबत असतांना बाबा

भीती न मज संकटाची

नीत भाव कणखरपणाचा

शिकवण जग जिंकण्याची //४//


Rate this content
Log in