Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendra Bansod

Classics

4  

Rajendra Bansod

Classics

*माझ्या मराठीचा गंध*

*माझ्या मराठीचा गंध*

1 min
216


मोगऱ्याच्या सुगंधापरी

दरवळते मराठीचा गंध

आसमंत उजाडले दिव्यत्वाने

पसरला चौफेर आनंद //1//


शब्दनशब्द जोडुनी भाषेचा

सजविला भावनांचा ताज

कर्तुत्वाने गाजविला डंका 

मिरवितो कीर्तीने महाराष्ट्र आज //2//


भक्ती अभंग ओव्यातील

सजली लेणे लावणी पोवाड्यात

भारुडानी शिकविली नाती

माणुसकीचे दर्शन घडावे मनात //3//


सह्याद्रीच्या कडे कपारी पासून

गडचिरोलीच्या टेकड्यात

निनाद तो गजर पराक्रमी

जपावा देशाभिमान हृदयात //4//


आदर मोठ्यांच्या संस्कारांची रूपे

जाती-पाती मुक्त भेदरहित जिने

कर्तृत्वाचे लेणी संगम साहित्य

संस्कृती वारसांची जोपासावी लेणे //5//


रणांगणातील शौर्य निसर्गातील सौंदर्य

बोबड्या ओठातील बडबड गीते

सोज्ज्वळ माय मराठी माझी

हृदयी स्नेहभाव वाढवावी प्रितं. //6//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics