मोर
मोर
1 min
50
मोर हा सुंदर पक्षी
पंखावर तयांची सुंदर नक्षी
नभात पाहूनी मेघगर्जना
मोर होई आनंदी मना //१//
सुंदर रेखीव त्याचे रंग
खुलवीत नाची अंतरंग
नर्तन तुझे रानीवनी
पाहून हर्षित होते मनी //२//
राजा शोभे तू पक्ष्यांचा छान
सर्वहृदयी सदा विराजमान
थुईथुई चाळ पायी वाजावी
निसर्गाची शोभा तू फुलवावी //३//
सुंदर डोक्यावरील तुरा
मिरवीत ऐटीत मान खरा
राष्ट्रपक्षी तू अभिमानाने शोभी
आनंदाची गाणे नाचत गावी //४//