STORYMIRROR

Rajendra Bansod

Romance Inspirational Children

3  

Rajendra Bansod

Romance Inspirational Children

आई

आई

1 min
221

श्वास मी तुझ्या अंतरीचा

शब्द मी तुझ्या ओठातील

गंध मी तुझ्या प्रीतीचा

 ध्यास तुझ्या संघर्षातील //१//


दिला जन्म तुम्ही 

सौंदर्य जगाचे दाविले

 उपकार किती अपार

 ऋण आजन्म मानिले //२//


 वेचावी किती कष्टकण

अनंत कोटी ऋण तुमचे

मिळावा अवसर सेवेचा

मागणे एवढेच मोठे //३//


आरसा मी तुझा अस्तित्वाचा

तूच प्रेमाची मंगल मूर्ती

साहूनी अपार हालअपेष्टा

दिली जगण्याची स्फुर्ती //४//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance