Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendra Bansod

Romance Tragedy

3.7  

Rajendra Bansod

Romance Tragedy

आठवणीत तुझ्या सजनी

आठवणीत तुझ्या सजनी

1 min
79

आठवणीत तुझ्या सजनी

मन हेलावूनी जाई

गंध प्रीतीचा तुझा

हृदयी साठवूनी राही ||१||

स्पर्श तुझा रेशमी

मन मखमली करी

साथ हवी मज जीवनी

सुखदुःखाच्या वाटेवरी ||२||

तू सोबतीला नाही

मन कसे हे मानीत नाही

आठवणीतील श्रावणधारा

पापण्या ओलेचिंब होई ||३||

तुझ्या आठवणींच्या लाटा

हृदयकिनारी आदळती

तु संगे नाही निराश मन

मनात त्सुनामी उठती ||४||

अंगणातील चाफा जुई

 हाक सदा तुज मारी

येण्याची वाट पाही डोळे

दारे खुली ही तिन्ही प्रहरी ||५||

मनाच्या खोल गाभाऱ्यात

पारवा वियोग गाणे गाती

तू नाही पण हरविले घरपण

आठवणी तुझ्या गं छळती ||६||

Rate this content
Log in