मार्गदर्शी शिक्षक
मार्गदर्शी शिक्षक


मार्गदर्शी जीवनातील
पथिक मी तुमचा
दीपमाळ वाटेवरील
सूर्य तुम्ही आयुष्याचा //१//
बालकास तेजत्व देवूनी
रेखिली जीवनसामर्थ्य
यशाची पहाट दावूनी
भरले आयुष्यात अर्थ //२//
समतेची ज्योत पेटवूनी
पाने विषमतेची जाळली
मज समाजभान शिकवूनी
सन्मानाची वाट दाविली//३//
प्रेम बंधुभावाने मित्ररूपी
साहस दिले उडण्याचे
उदाहरण खरा दातृत्वाची
नायनाट करी अडसरांचे//४//
तुमच्याकडुनी शिकावे
कर्तृत्वरूपी उरण्याचे
ध्येय बाळगुनी जगावे
आयुष्य सेवेने फुलण्याचे//५//
नित ऋणी मी गुरुराया
वंदितो कर दोन्ही जोडुनी
वरदहस्त मगितो डोया
आयुष्यक्रमन करतानी//६//