आईची माया
आईची माया
का रे देवा तू अस केला
ज्या घरात ती तुझ्या पूजे
साठी दिवस - रात्र वणवण
पायाने फिरत होती, तिजच घर
तू का सून केलं?
ती आई ची काय चुकी होती कि
तू त्या आईचा पदर सुनं केलं
इवल्याशा पिल्याला का तू नेल?
ज्या घरात होती उजेड त्या घरात तु अंधार केल
इवल्याशा पिल्यामुळे ज्या आई चा होटावर
हसी होती त्या हसीला का तु नेल?
जी आई कधीन रडणारी आज त्या आईचा
डोळ्यातून अश्रू येतय रे
का रे देवा तू अस केल रे
ती आईची माया का तू घेतली
ती आईचा जीव ज्या पिल्यात होते
तू त्यालाच नेल रे.
ती आई जिवंत असताना
मुत्यू देह सारखी झाली रे
तुला हे करून काय भेटलं
कारे देवा तु अस केल रे.
