ताई ची आठवण
ताई ची आठवण


आई-बाबा नंतरची
माझी जीव ताई
तूच होती ग
तुझ्या सोबतीची
प्रत्येक क्षण
खूपच छान होते गं
कधी ते भांडण
तर कधी ते ,
एकमेकांना
प्रेमाने बोलणं ,
हे आपल्यातच
असायचं ग
ताई माझ्याकडे
तुझ्या प्रत्येकआठवणी
घरही हृदयात
केला आहे ग
सोबत जाताना
नेहमी बोलायची
''सांभाळून चाल
धडपड नको करू
अशी धडपडत
राहते का ग
मी तिथेच हे बोलायची
आणि माझ्या मैत्रीण
आहेत ना
मला सांभाळायला
आणि तू मला
डोक्यात मारून
स्वतः हसायची''
आता त्या जागेवर
तुझा हा विचार करू
न
रडायला येतो ग
मामी सोबत
भांडण झाल्यावर
तूच समजावणारी
आत्ता मला कोण
समजवणार ग
जेवण करून घे ग ,
लक्ष नको देऊ ग ,
आता असं मला
कोण बोलण?
मनातलं सर्व काही
कोणाला सांगणार
अश्रूच्या धारा
मनातच ठेवणार...
तसे ते अश्रू
गपचूप पुसणार
सर्वांना तोंड
हसताना दिसणार...
ताई ताई बोलुन
घरातच फिरायची
आता हे ताई शब्द
कोणाला बोलणार?
आता मी एकटीच
राहणार तुझ्या
आठवणीचा घरात
अशीच मी जगणार
ताई तू पण माझी
अशीच आठवण काढणार का
मला विसरून जाणार