रंगले तुझ्यात
रंगले तुझ्यात
प्रत्येक क्षणी तुझी आठवण येऊ लागली
तुझे ते प्रेमाने बोलणे, क्षणभर मिठीत घेणे
हे डोळ्यात रुचू लागले....
प्रत्येक गोष्टी मनातली तुला सांगावी
असे मनाला वाटू लागले...
तुझे मेसेज ची प्रतीक्षा करणे...
हे मनाला वाटू लागले
मी तुला फोन करून प्रत्येक,
गोष्टी सांगणे, यात आनंद वाटू लागले.
ज्या दिवशी तुझ्याशी बोलणं होत नसेल,
त्यावेळी मनाला खूप वाईट वाटत असेल
कधीतरी तुझ्यावर, खूप राग येत असेल
तुझे बोलणे ऐकून, राग निघून जात असे
प्रेमात तुझ्या रंगले मी, हरवून माझे मन गेले..
रात्र दिवस एकच वाटे, तेव्हा हरून माझे भान गेले
स्वप्न तर होता पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत
राहावे, पण हे स्वप्न स्वप्नच राहिले.
गुंतले मी तुला विसरणार यासाठी..
विसरून मन लागत नाही......
तुझ्यात मी स्वतःला बघू लागले
माझ्या मनात फक्त तूच राहिले..
तुझ्या प्रेमात वेडी झाली मी,
तुझ्यात हरून माझे मन गेले.
एकेक क्षणी तुझी आठवण येऊ लागली..
तुला येऊन मिठीत घेणे असे मनाला वाटू लागले.
तुझे ते शब्द प्रेमात बोलणे
माझ्या हृदयातरुचू लागले....
किती लिहू तुझ्याबद्दल, शब्दच कमी पडेना.
व्यक्त केले स्वतःला, दूर जाणाऱ्या साठी
हा वेडा मन फक्त तुला शोधू लागले
..... फक्त तुला शोधू लागले

