बाबा
बाबा
बाबा हे शब्द किती अनमोल आहे
बोलताना शब्दात प्रेमाचे
भावही दिसतात...
बाबा बोलत असतो
रागवत असतो
त्यातूनही तेवढा प्रेम
ही करत असतो,
बाबा तू किती अनमोल आहे.
कुठेही गेलं तर,
आपण बाबाला म्हणतो,
बाबा मला हे घेऊन दे ,
पैसे असून सुद्धा
मुलांची इच्छा पूर्ण करतो.
म्हणून बाबा तु किती अनमोल आहे...
आपल्या नावा मध्ये ,
बाबा चे नाव असते
त्याच्याशिवाय आपले अस्तित्व नसते..
बाबा तू किती अनमोल आहे.
दिवस-रात्र कष्ट करतो ,
मुलांचे स्वप्न पूर्ण करतो
थकून आल्यावर आपल्या ,
मुलाला बघून सर्व विसरून जातो
मुलासोबत खेळता-खेळता
स्वतः रमून जातो.
कितीही दुःखात असले
तरी बाबा कोणाला दाखवत नाही ,
म्हणून बाबा तू किती अनमोल आहे...
