तान्हूला सानुला
तान्हूला सानुला
बाळ जो जो रे जो जो
निद्रेच्या कुशीत झोपी जा जो
तान्हूला सानुला
माझा बाळ छकुला
अंथरुणावर निजले
बाळं सुर्य देव झोपले
शीतलतेनं आले मामा
आटोपलं बाळ सर्व कामा
तुझ्या संग तुझी आई
बाळा गाते रे अंगाई
आकाशात तारा परी
येथील बाळ आपल्या घरी
सोन किरणांची सकाळी
वासूदेव मुखी गातील भूपाळी
अंगाई गाऊन रुजविते
आई तुला जोजविते
स्वप्न सखी वाट पाही
निजल्या बाळ दिशा दाही
झोप रे झोप बाळ
तुझी माझी एक नाळ
चांदो मामा सोबतीला
निद्रा आली रात्रीला
डोळे बाळ मिटून घे
आता बाळ निजून घे
अंथरुण आहे मऊ मऊ
जो जो रे जो जो झोपी जाऊ
