गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमा
गुरु देई अथांग ज्ञान जगाचे,
जागवी भान वस्तुस्थितीचे||
गुरु करी सर्व प्रश्नांची उकल,
करी आपले जीवन सफल||
दाटून संकटांचा येई गूढ अंधार,
गुरुची शिक्षा ज्योत बनून देई आधार||
कधी ङगमगू देत नाही,
पण श्रेय तीळमात्रही घेत नाही||
तन - मन - धन वाहून करी शिष्याचा उद्धार,
अडथळे सहजगत्या होती पार||
स्वतः करी सर्व मोहपाशांचा त्याग,
त्यासाठी सहन करी हसतमुखी लागलेले डाग||
तिलांजली वाहिली तयाने मान - संपत्तीवर,
निर्माण करीत जाई फक्त "माणसे" तो खंडीभर||
आज जाणवते गरज अशाच परोपकारींची,
घट्ट तग धरतील पिढ्या भविष्यकाळात खरोखरी|| 96
