STORYMIRROR

सई कुलकर्णी

Romance Fantasy Others

3  

सई कुलकर्णी

Romance Fantasy Others

जपून ठेव सारे

जपून ठेव सारे

2 mins
218

तुझ्यासाठी तो पहिला क्षण कुठला होता, माहीत नाही

माझ्यासाठी कुठला होता, आता सांगण्याची वेळ नाही

तरीही जपून ठेव सारे


आलास काय, बोललास काय,

मी नाही म्हटलं तर निघून गेलास काय,

तुला कळलं नाही आणि मी सांगितलंही नाही

पण थोडीशी माझ्यातली "मी" घेऊन गेलास काय

मनातच मात्र जपून ठेव सारे


तुझं मला बघणं, तुझं न बघणं,

स्वतःचं लेक्चर संपल्यावर तुझं माझ्या क्लाससमोर येणं,

कॉलेज सुटल्यावर गेटबाहेर घुटमळणं,

कॉलेज ते स्टेशन आणि स्टेशन ते कॉलेज माझ्या पुढे मागे असणं,

किती निरागस होतं ते,

सगळं मनाच्या एका कप्प्यात आहे

तुझ्या मनातलेही जपून ठेव सारे


तुझं माझी ट्रेन येईपर्यंत रेल्वेच्या ब्रिजवर वाट बघत थांबणं,

तू ज्या दिवशी नसायचास त्या दिवशी माझं स्टेशन धुंडाळणं,

परीक्षेचा पेपर देऊन तुझं माझी वाट बघणं,

जपून ठेव सारे


वाटून गेलं बरंच काही तुला, भिजवून गेलं ते सगळं मला,

जाणवत होतं, कळत होतं, नाकारत नाही, वेळोवेळी ते मला,

माझं एक मन तुझ्यापाशीच तर होतं,

पण उगाच मुखवटा घालून, नाही नाही म्हणत, दुसरं मन मात्र लांब उडत होतं, आता हसायलाच येतं

तरीही जपून ठेव सारे


स्पेशल होतास तू, तुझं स्थान,

बेधडक मला प्रपोज करणारा पहिलाच,

आजही सगळं स्पष्ट आठवतं मला,

कारण कुठेतरी हलवून गेलास मला,

इतकं सुंदर होतं सगळं,

जपून ठेव सारे


तुला नसतील माहीत पण मला पाठ होते

तुझ्या शर्टांचे कलर्स,

किती वेडे होते पण गेले ते दिवस,

तुझी कॉलेजची क्रॉस बॅग सुद्धा लक्षात आहे माझ्या अजून

भारावलेले क्षण, जपून ठेव सारे


तुझं ते १४ फेब्रुवारीला माझ्याशी बोलणं,

गिफ्ट देणं आणि माझं नाकारणं,

"फ्रेंड्स राहू" या तुझ्या युक्तीला माझं विरोध करणं,

पण परत तब्बल १६ वर्षांनी आपण फ्रेंड्स होणं,

योगायोग की नियती की दोघांची प्रबल इच्छाशक्ती,

जे काही आहे, जपून ठेव सारे


ऋणी आहे मी देवाची

तुझ्यापाशी त्याने आणलंच मला

माझ्यातली घेऊन गेलेली ती "मी" आज गवसले मला

सर्वोच्च श्रेष्ठतम मैत्रीचं नातं, तेच तेवत ठेऊ आता जपून ठेव सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance