STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

4  

Prashant Shinde

Romance

शोध...!

शोध...!

1 min
475

तारुण्य शिरले अंगात

जीवन आले रंगात

काय पाहिले मी स्वप्नात

सांगते तुमच्या कानात...


राज कुमारी एकुलती

लाडकी मी आई बाबांची

चौक्या पहारे माझ्या भोवती

कोणीच न फिरके अवती भोवती...


हूर हूर सद जीवास माझ्या

राजकुमाराची लागून राही

सदैव दिनरात मी 

त्याची वाट पाही...


वाटले मज आज

बंधन झुगारून दूर निघून जावे

हव्या त्या राज कुमारसी

एकदाचे मिलन व्हावे...


विचार प्रबळ होता

निद्रा राणी आली धावून

म्हणाली मजला ती

काळजी नको करू मी जाते घेऊन...


अलगद उडाले मी 

पलंगासह अवकाशी

शोधून भेट घेण्या

स्वप्नातील त्या राजकुमाराची...


राजबिंडा राजकुमार पाहून

गेले मी पूरती हरकून

थांब म्हणाले त्याला क्षणभर

येते मी आन्हिक क्षणात उरकून...


ती हसला मज पाहून

अन मी लाजले डोळे झाकून

इतक्यातच मुजरा केला

दासीने कमरेत वाकून...


जागी झाले आळस झटकून

रागावले सारे धुडकावून

दालनासी राजमुमार स्वप्नीचा पाहुनी

बसले माझ्यातच मी हरवून....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance