देव
देव
माझ्या मूर्तीचीच पूजा कर,
पूजेच्या नावाखाली भ्रष्टाचार कर,
त्याच पैशातून नशा कर,
देव म्हणत नाही........................... १
सर्वत्र प्रदूषण कर,
जैविश्वाला हैराण कर,
वरुन उन्मत्तपणाचं प्रदर्शन कर,
देव म्हणत नाही........................... २
भक्तांच्या दर्शनाचा व्यापार कर,
पैसे उकळ, काळा-बाजार कर,
सर्वसामान्यांना बेजार कर,
देव म्हणत नाही........................... ३
भक्तीचा मूळ उद्देश हनन कर,
जातीयवादाचा कळस कर,
गरीब-श्रीमंत भेदाभेद कर,
देव म्हणत नाही........................... ४
मूर्तीच्या उंचीत स्पर्धा कर,
त्यात सर्वांचा जीव अर्धा कर,
पवित्र सण किळसवाणा कर,
देव म्हणत नाही........................... ५
अश्लील गाण्यांवर नाच कर,
कानठळ्या बसवणारा आवाज कर,
बिभत्सपणे उन्माद कर,
देव म्हणत नाही........................... ६
सोयी-सुविधांचाच पैसा वापर,
देवस्थानं निर्माण कर,
राजकारण-पक्षपात कर,
देव म्हणत नाही........................... ७
देशाच्या उत्कर्षाचा विच्छेद कर,
भल्या माणसांचा निषेध कर,
समाज-प्रगतीला लाचार कर,
देव म्हणत नाही........................... ८
