STORYMIRROR

सई कुलकर्णी

Romance Fantasy Others

3  

सई कुलकर्णी

Romance Fantasy Others

ओंजळभर का होईना

ओंजळभर का होईना

1 min
284

ओंजळभर का होईना

नजरेनेच फुलव मला

तुझ्या बघण्यानेच हर्ष

रोमरोमात पसरेल जसा .... १


ओंजळभर का होईना

शब्दांनीच भिजव मला

तुझ्या बोलीच्या जादूने मनाला

गार वारा स्पर्शतो जसा .... २


ओंजळभर का होईना

तुझ्याच स्टाईलने वाग असा

तुझ्या अस्तित्वाचाच प्रत्येक अंश

घट्ट करेल आपल्यातल्या विश्वासाला .... ३


ओंजळभर का होईना

प्रेमाला आटूदे आपल्यातल्या

थर चढेल बघ आपोआपच

प्रीतीच्या जाड सायीचा .... ४


ओंजळभर का होईना

प्रभावित क्षण दे मला

आभास होत राहील त्यांच्या साथीने

जवळ नसतानाही तू असल्याचा .... ५


ओंजळभर का होईना

अबोला असूदे तू बिझी असताना

आणून सोडतात तुझ्यापाशी

मला आठवणीच तुझ्या .... ६


ओंजळभर का होईना

रडून मोकळा हो सख्या

नंतर येणारा आनंद

आयुष्यभर रिझवेल तुला .... ७


ओंजळभर का होईना

आयुष्यात येत रहा माझ्या

तुझ्या सरींनी तृप्त

होत राहील माझी धरा .... ८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance