STORYMIRROR

Rahul Mane

Romance

4  

Rahul Mane

Romance

तुला काय करता येणार नाही..!

तुला काय करता येणार नाही..!

1 min
404


माझ्‍या आयुष्‍याचे चांदणे

पांघरता तुला येणार नाही

चंद्र ही असेल चार चतकोरी

गारवा तसा मिळणार नाही...(१)


जीवन माझ फाटकी चादरं 

दडपून झोपता येणार नाही

स्‍वप्‍न मोठं असेल कोरं

रंगवता मात्र येणार नाही...(२)


ओठावरती सत्‍य तरी

बोलता तुला येणार नाही

तू अण मी एकांत सोबती

रुसता तुला येणार नाही...(३)


बनून माती भरून छाती तुझ्‍या

पावलासरशी जमीन बनेन

शब्‍द तुझा धडपड माझी

पूर्णत्‍वाला बळी पडेन...(४)


जीव गूंतला एकमेकात असा

मरण स्‍वतंत्र येणार नाही

पकडलास हात एकदा का

सोडता पुन्‍हा येणार नाही...(५)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance