शपथ
शपथ
घेतो शपथ स्वतःची, अन् सांगतो तुला,
आणून चंद्र आता, मी माळतो तुला!
नाही कठीण जगणे, तू बोलतो सदा,
दारिद्रय माणसांचे, चल दावतो तुला!
भांडून सांगते का, नाही मनी कुणी,
माझ्यात गुंतताना, मी पाहतो तुला!
दारात ह्या बसूनी, रडतेस का उगी,
गर्दीत माणसांच्या,बघ आणतो तुला!
ना आवडे मला गं, हे वागणे तुझे,
तो चंद्रही नभीचा, बघ हासतो तुला!
संसार त्यागला हा, ऐकून घे जरा,
ही भेट आपुली रे, बस मागतो तुला!
व्यवहार या जगाचा,आहेच मतलबी,
नाही जगा परी तू, मी जाणतो तुला!

