STORYMIRROR

Dhanaji Jadhav

Inspirational

3  

Dhanaji Jadhav

Inspirational

गझल  "दुनियेस पाहिले मी.."

गझल  "दुनियेस पाहिले मी.."

1 min
510


गझल:- "दुनियेस पाहिले मी.."



हे पाय ओढतांना, दुनियेस पाहिले मी,

अन् साथ सोडतांना, दुनियेस पाहिले मी!


देतील मान आधी, घेऊन वळचणीला,

स्वप्नास तोडतांना, दुनियेस पाहिले मी!


निःस्वार्थ भावनेने, देतील हात हाती,

नात्यास जोडतांना, दुनियेस पाहिले मी!


पारावरी बसूनी, करतात लोक चर्चा,

कैफात बोलतांना, दुनियेस पाहिले मी!


पोथी पुराण सारे, वाचून खूप गेले,

ज्ञानास तोलतांना, दुनियेस पाहिले मी!


रडवून दुःख गेले, माझ्याच अंतरीला

अश्रूस मोजतांना, दुनियेस पाहिले मी!


भेटून सर्व काही, करतात हाव वेडे,

नशिबास कोसतांना, दुनियेस पाहिले मी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational