STORYMIRROR

Dhanaji Jadhav

Tragedy

3  

Dhanaji Jadhav

Tragedy

बापास पाहिले मी ......

बापास पाहिले मी ......

1 min
2.1K


बापास पाहिले मी, पोटास मारताना,

चोरुन भाकरी ही, आम्हांस वाढताना...


नाहीच देव येथे, म्हणतात लोक काही,

देवास पाहिले मी, सर्वांस तारताना...


उपकार जाणिले ना, त्याने तिचे कधीही,

आई स्वतः उपाशी, बाळास चारताना...


देऊ नको जरा ही, ईर्ष्येस भाव आता,

धनिकांस पाहतो मी, गर्वात हारताना...


घेऊ नको कधी रे, उपकार ह्या जगाचे,

होतील यातना त्या, उपकार सारतांना...


सत्कर्म चांगले तू, कायम करीत जावे,

जाशील बघ तरूनी, दुःखात वाहताना...


छळतोस तू किती रे, दररोज वंचितांना,

मी पाहिले तयांना, अश्रूस गाळताना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy