एकटाच जाणार आहेस।
एकटाच जाणार आहेस।
ज्या हातांना धरून बालपनी,
पाऊले चालली होती शाळेकडे।
"हे नविन जग कोणते?"
या संभ्रमात
बालपन ते हरवलेले,
सापडले तरूणपणी,
तर , तेच हात धरून,
पाऊले चालत होती
वृध्दाश्रमाच्या दिशेने।
झिजून झिजून देह।
मोडकळीस आला।
आणि शेवटी थकलेला देह।
व्हिल चेअर मधे बसला।
तेव्हा त्या देहाचे,
भार लोकास झाले
आणि व्हिलचेअर मधील
दोन प्रश्नार्थक डोळे,
"बाळा मी कुठ चालले? पुसत
वळली वृध्दाश्रमाच्या दिशेने।
आपले व त्यांच्या नात्याचे परिणाम,
जर येवढे भयावह आहे,
तर काय हरकत,
अनाथांना आश्रय देवून,
अनाथ होण्यास आहे?
शेवटी एकच सत्य आहे,
एकटा आलास,
एकटाच जाणार आहेस।