प्रेम म्हणजे काय असत।
प्रेम म्हणजे काय असत।
प्रेम म्हणजे काय असतं.
नका पुसू आम्हास,
प्रेम म्हणजे काय असतं।
प्रेमाचा ग्रंथ निराळा,
जो वाचला तो तरला।
प्रेम या दोन शब्दात वरदान।
प्रेम या दोन शब्दात जिवनदान।
प्रेम या दोन शब्दात
जिवनातली जान।
प्रेम या दोन शब्दात
तुझे माझे प्राण।
प्रेम हे एक कोडे।
जो पडती प्रेमात त्यास ते उलगडे।
प्रेम नाही शब्दांचा जाल।
प्रेम फक्त भावनांचा श्रूंगार।
प्रेम म्हणजे त्याग।
प्रेम म्हणजे समर्पण।
प्रेम म्हणजे एक चिंतन,
जीवन मरणाचा।
नका पुसू आम्हास,
प्रेम म्हणजे काय असतं।
उत्तर हे वहीत न सापडे।
मन शोधावे लागती आपले।

