STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

4  

Asmita prashant Pushpanjali

Others

फुकाचा हा गर्व

फुकाचा हा गर्व

1 min
233

फुकाचा हा आहे गर्व,

फुकाचा हा अभिमान.

देह इथेच ठेवून,

निघून जाइल प्राण।


श्वासाच्या झुल्यावरती,

पंचप्राणाचे हिंदोळे.

 जैसी करती ही कर्म,

मिळवती तैसी फळे.


सुखद वाटते जरी,

छळ कुणाचे करणे.

घटिका भरता क्षणी

कठीण जीव सोडणे.


ग्वाही मनाची दुरून,

देतील कंठ दाटून.

पाणावल्या डोळ्यातील

जातील अश्रू आटून.


फुकाचा हा आहे गर्व,

फुकाचा हा अभिमान


साहित्याला गुण द्या
लॉग इन