STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Classics

3  

Asmita prashant Pushpanjali

Classics

तुझ्याविना (गझल)

तुझ्याविना (गझल)

1 min
353

तुझ्याविना सुनेच ते दिवस सुनीच रात ती।

कसे कुणा कळे न राज हे जुनीच बात ती।


 अजून पेटते कुठे तरी विरह वनात जी,

तिमीर दूर सारती जळे मनींच आत ती।


किती तुला जपू मनात दारबंद आड रे,

गुन्हा पुन्हा घडो मनोमनी गुणींच जात ती।


जरा कुठे तरी कबूल कर मनी तुझ्या मला,

हरून दाखवेन आज मी जुनीच मात ती।


तुझ्या शिवाय या मनास का उदास वाटते, 

म्हणे जयास प्रेम सर्व पेटतीच वात ती।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics