तुझ्या भोवताली
तुझ्या भोवताली
तुझ्या भोवताली गुंतल्याचा भासलो मी
पुन्हा पुन्हा वेडेपणात तुझ्या ग्रासलो मी
तुझा मुखडा पाहण्याचे वेड लागले की
कोणास ही नकळता गाली हासलो मी
काल पाहिले काहींनी मला देवळात त्या
कुजबुज सारीकडे उगाच का नासलो मी
काल झुकले होते सारेच बाजूने माझ्या
पूर तिरस्कारांचे पाहून मागे धावलो मी
दुफळी झाली इतकी मनात त्यांच्या की
दोन मनाचे अंतर मोजतांना त्रासलो मी

