तू दिलेल्या जखमांवर
तू दिलेल्या जखमांवर


तू दिलेल्या जखमांवर मुलामा चढवला होता
तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता
प्रेमाचं चार ओळींच पुस्तक लिहायचं होतं
असं ही तुझ्यामुळे जिवंतपणी मरायचं होतं
विसरली तुझा एक एक हट्ट मी पुरवला होता.
किती दिवस झाले तू सारं विसरून गेली
आयुष्याच्या सुखाची जमापुंजी हिरावून नेली
तुझ्या अहंकारी दुष्मणाने घात केला होता
वावडेच झाले मी तुझ्या जीवनात असल्याचे
बोलतांना तुझे कटू शब्द कधी कधी डसायचे
तुझा हट्टी स्वभाव समुद्रापार तू नेला होता
विश्वास ठेवून तुझ्यावर प्रेम मी केलं होतं
साऱ्या स्वप्नांना तू पायदळी चिरडलं होतं
माझ्या बद्दल तू सारा गैरसमज भरवला होता
तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता
किती समजावले तुला तू समजली नाही
या प्रेमाची कहाणी कधी तुला उमजली नाही
तुझ्यावर प्रेम करणारा प्रेमी तू रडवला होता