तुझं उत्तर
तुझं उत्तर
कॉलेजात असतांना
तू मागे वळून पहिलंच नाही
अंतकरणातल्या मनाला
तू कधी जानलचं नाही
आयुष्य सुंदर असतांना तू आली
विरंगुळ्यात होतो तू वाऱ्याची झुळूक झाली
वेगळंच व्हायचं बघ
जेव्हा तू जवळून जायचीस
अस्ताव्यस्त व्हायचो
तेव्हा तू माझे भास व्हायचीस
मी उगाच तुझ्या मागे मागे फिरतं होतो
तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांसाठी झुरतं होतो
अस एक तर्फी प्रेम
करणं चुकलं होतं
तू दिलेल्या खोट्या आशेन
काळीज तुटलं होतं
असं कसं तुझं अन प्रेमाचं पटलंच नव्हतं
तुझ्यावर असणार माझं प्रेम घटलंच नव्हतं
जुन्या आठवणी घेऊन
तू कधी स्वप्नात आलीस
उरल्या सुरल्या सुखांना
आज अश्रू देऊन गेलीस
अस नको छळूस गं आता सहन होत नाही
मी दिलाचा राजा असून काटे टोचलेत काही
एक दिवस वाटलं
तू सारं विसरली असशील
दुःखाच्या जहाजेवर
नकळत बसली असशील
पण तुझे नखरे सारे सारं सांगून गेले
जरासे सुख होते जवळ ते ही पांगून गेले
मला जायचंच होतं
मी जाणारच होतो
आत्मा तुझ्याजवळ ठेऊन
शरीराने जळणारच होतो
म्हणलं गेल्याचं कळल्यावर तरी येशील तू
माझ्या थडग्यावर येऊन तरी उत्तर देशील तू
