तू लेखणी माझी
तू लेखणी माझी


तू लेखणी माझी
मी तुझा कोरा कागद
नेहमी तुझ्या स्वप्नांची
माझ्या कवितेला साद
अशीच रहा तू सखे
काळजाची होऊन
तुला आठवत राहील
तुझ्या काळजात राहून
विखुरला जातो मी
तुझ्या मिठीत येतांना
प्रेमाच्या गोष्टी सखे
तुझ्याशी बोलतांना
तू असावीस जवळ
स्वप्नात नवे रंग भरतांना
कासावीस होतो मी
ती सांज जवळ येतांना
तू जवळ असलीस की
शब्दांची शाळा भरते
तू समोर आहेस समजून
नव्या कवितेची मांडणी होते
वाऱ्याची झुळूक होऊन
किती तरसावणार आहे
आता आसवे होऊन तू
असं किती बरसणार आहे