कधी हसरी तर कधी गप्प ती
कधी हसरी तर कधी गप्प ती
तिच्या मनात प्रेम होतं
तिचं माझं गप्प राहणं सेम होतं
ती कधीतरी बोलायची
अन मी गोंधळून जायचो
काळजातलं तिचं अस्तित्व अनुभवायचो
कधी कधी आसवांनी खांदा ओला व्हायचा
काय झालं असेल म्हणून जीव प्रश्न करायचा
पण कधी गप्प तर कधी हसरी ती
प्रेमाच्या वाटेवर कधी आली
नकळत कधी भावली
मला कळलंच नाही......?
तिला घाईच असायची
मला प्रपोज करायची
पण ती कधी बोललीच नाही
अन मी ही तिला समजून घेतलंच नाही
माझ्या मनानं तिचं प्रेम जपलंच नाही
इथंच प्रेमाचं सारं घोड अडलं होतं
ह्याचं गोष्टीच गणितं मला नडलं होतं
पण कधी गप्प तर कधी हसरी ती
प्रेमाच्या वाटेवर कधी आली
नकळत कधी भावली
कळलंच नाही.....….?
असाच मी तसाच मी
ती मला कधी म्हणलीचं नाही
तिच्या मनाची तिजोरी
तिनं माझ्यासमोर खोललीचं नाही
ती बोलेल कधी तरी म्हणून
हीचं आशा धरून बसायचो मी
पुन्हा तिचा फोटो पाहून हसायचो मी
पण कधी गप्प तर कधी हसरी ती
प्रेमाच्या वाटेवर कधी आली
नकळत कधी भावली
कळलंच नाही......?
कॉलेजच्या कट्टयावर
ती मला खेटून बसायची
अभ्यासाची गोडी असून ही
सोबत असतांना ती तिच्यात नसायची
कळत नव्हतं काहीच मला
मी फक्त वेड्यासारखा वागायचो
मोबाईलचा आरसा करून तिला बघायचो
तिचा हसरा चेहरा बघून खुश रहायचो
पण कधी गप्प तर कधी हसरी ती
प्रेमाच्या वाटेवर कधी आली
नकळत कधी भावली
मला कळलंच नाही.....?
ती खूप प्रेमळ होती
मनांन निर्मळ होती
आयुष्यभर सोबत देईल
हीचं पक्की खात्री होती
तिला मी हवा होतो
मला ही ती हवी होती
पण मी सारं डोळे झाक करतं होतं
तिच्यासाठी आतल्या आत झुरतं होतो
मला तिच्या प्रेमाचं खेळणं करायचं नव्हतं
तिच्या स्वप्नांना फक्त सुखानं भरायचं होतं
पण कधी गप्प तर कधी हसरी ती
प्रेमाच्या वाटेवर कधी आली
नकळत कधी भावली
मला कळलंच नाही...
