तुला शोधत असतो
तुला शोधत असतो


बघ आता सगळे ऋतू
एक व्हायला लागलेत
पण तू जरा हट्टी आहेस
ते ही दोष द्यायला लागलेत
तुझ्या माझ्या प्रेमाच्या चर्चा
गावभर व्हायला लागल्या
या लॉकडाऊनच्या काळात
न भेटताच रात्र जायला लागल्या
आरसे घेऊन निहाळत बसतो
स्वतःच्या असलेल्या अस्तित्वाला
तुला शोधत असतो मग त्या
उरल्या सुरल्या दोष देऊन श्वासाला
वाढवून प्रेमातल्या दुराव्याला
मी नाही गं तूच मोठं केलंस
आपल्यातल्या आपलेपणाला
नकळत तू आता दूर लोटलंस
आता तो व्हायरस आलाय ना
बघू तू जगणार की मी जगणार
पण एक नक्कीच होणार बरं का
तू तुझ्या खऱ्या प्रेमाला मुकणार