STORYMIRROR

Priti Thakare

Tragedy

4  

Priti Thakare

Tragedy

स्त्री जन्मा तुझ्या कष्टाची

स्त्री जन्मा तुझ्या कष्टाची

1 min
28.1K


रस्त्याच्या एका बाजुला

ती फडे विकत होती

सुर्याच्या तडपत्या किरणांची

वेदना तिला भेदत होती


रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला

पणत्या ती विकत होती

सभोवती असणाऱ्या तिच्या लेकरांभोवती

ओसरलेल्या नजरेने बघत होती


सामानांच्या भाऊगर्दीत

प्रश्न तिला पडला होता

कशी होईल दिवाळी साजरी

मालाला भाव मिळत नव्हता


विस रुपयाला एक फडा

दहा रुपयाला बारा पणती

अशा तिच्या हाकेवर

तिची दिवाळी सजणार होती


लेकराबाळांना कपडे

नवऱ्याची चिंता हरणार होती

स्त्री जन्मा तुझ्या कष्टाची कहानी

आता कुठे संपणार होती


बघून संसार संघर्ष

त्या माऊलीचा

डोळयांच्या कडा माझ्या

पानवत होत्या

खरेदीचे ओझे वाटणाऱ्या

माझ्या हातांना 

खूप काही शिकवित होत्या.

खूप काही शिकवित होत्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy