पाय मातीचे
पाय मातीचे
1 min
14K
शेवटी पाय त्यांचेही मातीचे निघाले |
रूतू हे सारे काही साथीचे निघाले |
मैत्री बंधूभाव समानता शब्दांचे बुडबुडे
खरे दावे त्यांचे जाती पातीचे निघाले |
खूप मारिल्या गप्पा आम्हीच समानतेच्या
फटाके सारे फुसक्या वातीचे निघाले |
तुझी वचने, त्या आणाभाका गेल्या कुठे?
बाजारी वाभाडे बघ प्रितीचे निघाले |
ठेवू भरवसा कुणावर देवही तो बाटलेला
धिंडवडे त्या भाबड्या भक्तीचे निघाले |